कोरोना विषाणू रोगाचा प्रतिकारासंबंधी आवश्यक उपाययोजनांसाठी आढावा बैठक संपन्न.

कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रतिकारासंबंधी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी आज उपविभागीय कार्यालय निलंगा येथे उपविभागीय आपातकालीन अधिकारी श्री.विकासजी माने यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न.

सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, दिनांक 2 एप्रिल रोजी निलंगा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, दिनांक 31 मार्च दुपारी 12:00 वाजेपर्यंत रक्तदानासाठी नागरिकांची नाव नोंदणी करण्यात येईल. यासाठी खालील क्रमांकावर आपली नोंद करावी.

संपर्क-
डॉ.सोंदळे (जिल्हा उप रूग्णालय अधीक्षक) मो. क्र. 8275178348
नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे मो. क्र. 9923264244
उपनगराध्यक्ष श्री.मनोज कोळ्ळे मो. क्र. 8830335385
डॉ. लालासाहेब देशमुख मो. क्र. 9881170000
डॉ. किरण बाहेती मो. क्र. 9921040400
श्री.अरविंद चौहान मो.क्र. 8379832555
श्री.दत्ता मोहलकर मो. क्र. 9404588028
श्री.इरफान सय्यद मो. क्र. 9890240333
श्री.सुमित ईनानी मो. क्र. 98607 87814

या पुढील 3 महिन्यांसाठी प्रशासनाकडून अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनी आश्वस्त राहावे.

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 8:00 ते सकाळी 11:00 या वेळेत खरेदी करण्यासाठी व वैद्यकीय खरेदीसाठी सकाळी 8:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत नागरिकांना सवलत देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास आवश्यक वैद्यकीय कर्मचारी आपल्या विभागातील आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्यास, शासकिय अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा जेणेकरून तात्काळ सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात येतील.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपविभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, निलंगा यांच्या अंतर्गत आपत्ती व्यस्थापन कक्षाच्या माध्यमातून आपातकालीन नियोजन करण्यात आले असून, सर्व आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अधिकारी व शासकीय कर्मचारी यांची निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांसाठी एकूण 1922 जणांचा समूह कार्यरत करण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षिततेसाठी कायम दिवसरात्र कटिबद्ध असून, त्यांना सहकार्य करणे ही नागरिक म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी परिस्थितीचे भान जपून सर्वांनी आपल्या कुटुंबासमवेत घरीच राहावे.