कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक व यानंतर लातूर जिल्ह्यासाठी ऑक्सफॅम इंडिया यांच्या मार्फत उपलब्ध झालेली आरोग्य उपकरणे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत मा.जिल्हाधिकारी श्री. बी.पी. पृथ्वीराजजी यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
विविध कोव्हिड केअर सेंटरच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, लसीकरण मोहीम, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, दिव्यांगांचे घरपोच लसीकरण, ॲम्बुलन्सची उपलब्धता, ऑक्सीजन प्लांट, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग अशा विविध विषय या बैठकीत चर्चिले गेले.
यानंतर लातूर जिल्ह्यासाठी ऑक्सफॅम इंडिया यांच्या मार्फत उपलब्ध झालेली आरोग्य उपकरणे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली, लातूरमधील जनतेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार..!
२ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २० बेड, २५० नोझल मास्क, आय.सी.यु. कक्षासाठी आवश्यक असणारे ४ मॉनिटर, १२५ थर्मामिटर, ६ बीपी मिटर, १५ ऑक्सिमिटर, २० ऑक्सिजन फ्लो मिटर आदी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
श्री.पंडितजी सुकणीकर हे अत्यंत तळमळीने कार्य करत असून त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी तिसऱ्यांदा हे सहकार्य मिळवून दिले आहे तसेच अजून सहकार्य मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्ह्यासाठी त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पाठपुरावा करीत असून त्या अनुषंगाने आरोग्य साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर साहित्य जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना द्यावीत अशी विनंती केली. त्याचबरोबर लवकरच आणखी मोठ्या प्रमाणात आरोग्य उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येतील.
यावेळी जि.प. अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मणजी देशमुख, ऑक्सफॅम इंडियाचे प्रोजेक्ट चेअरमन श्री.परमेश्वरजी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री.गंगाधरजी परगे, चेअरमन श्री.दगडुजी साळूंके, माजी सभापती श्री.बापूजी राठोड, जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंडीतजी सुकणीकर आदींची उपस्थिती होती.