देवणी ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट

देवणी ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी ५० बेड वाढवावे आणि त्यापैकी ३० ऑक्सिजन बेड असावेत अशा सूचना करण्यात दिल्या. सध्या येथील रुग्णालयात ११५ बेड कार्यान्वित आहेत.
त्याचबरोबर सेंट्रल ऑक्सिजन सप्लाय पाईप लाईनसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. अक्का फाउंडेशन तर्फे मल्टिपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, पिल्लो, फ्लॉ मीटर, डी.थर्मामिटर, ऑक्सिजन नेजल मास्क व इतर आवश्यक आरोग्य साधनांचे वाटप केले. सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत आणि एकंदरीत व्यवस्थापनाबाबत विचारपूस केली.
तसेच तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेऊन, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सक्तीने करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.विकासजी माने, सिव्हिल सर्जन डॉ.सी.एस.देशमुख, देवणी तहसिलदार श्री.सुरेशजी घोळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.निळकंठराव सगर, बीडीओ श्री.मनोजजी राऊत, तालुका आरोग्य अधिकारी श्री.गुरमे जी, डॉ.कालिदासजी बिरादार, डॉ.अॅन्थोनी, कृषी सभापती श्री. गोविंदजी चिलकुरे, तालुकाध्यक्ष श्री.काशिनाथजी गरीबे, सभापती सौ. पाटील ताई, उपसभापती श्री.शंकररावजी पाटील, जेष्ठ नेते श्री.हावगीराव पाटील, श्री.दगडूजी साळुंके, श्री. भगवानराव पाटील, माजी उपाध्यक्ष जि.प. सदस्य श्री.रामचंद्रजी तिरुके, जि.प.सदस्य श्री.प्रशांतजी पाटील, श्री.शिवशिवे सर, माजी नगराध्यक्ष श्री.वैजनाथजी अष्टुरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मनोहरजी पटणे, श्री.तुकारामजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.बालाजी बिरादार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.रामलिंगजी शेरे, श्री.संतोषजी पाटील, श्री.ओमकारजी धनुरे, श्री.प्रशांतजी पाटील दवणहिप्परगा, श्री.मयुरजी पटणे, आणि ज्येष्ठ पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.