मा. देवेंद्रजी फडणवीस : मराठवाड्याचा भक्कम आधार- 4

Rail Coach Factory

मा. देवेंद्रजी फडणवीस : मराठवाड्याचा भक्कम आधार- 4

आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या आशापूर्तीचे स्थान. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांचा समतोल विकास साधण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी कायम पुढे असतात. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राने एक अभूतपूर्व विकासपर्व पाहिले. समाजातील शेवटच्या घटकाचा देखील विचार करणारे एक जनसामन्यांचे सरकार, ज्याने राज्याला प्रगतीची आणि विकासाची नवी दिशा दिली. ‘चांदा ते बांदा’ पर्यंत सुरु झालेल्या नवमहाराष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेत आदरणीय देवेंद्रजींनी मराठवाड्याला देखील सामावून घेतले. मराठवाड्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विकासकामांची भलीमोठी मालिका मराठवाड्यात सुरु झाली. यातील दोन सर्वात मोठे व महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आणि मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प.

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या उभारणी वेळी आदरणीय देवेंद्रजींनी दाखवलेला मुत्सद्दीपणा, सूक्ष्मनियोजन क्षमता व कार्यतत्परतेने संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध केले. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाने मराठवाड्यातील जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला. विकसित आणि समृद्ध मराठवाडा हे स्वप्न नसून ती एक सत्यता आहे, ही भावना जनतेच्या मनात दृढ झाली आहे.

केंद्र सरकारचा कोच फॅक्टरी प्रकल्प मराठवाड्यातच व्हावा, हा विषय आदरणीय देवेंद्रजींसमोर मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ या गोष्टीला अनुमोदन दिले. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक-यांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले. रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यासाठी एक सांगोपांग विचारनिष्ठ प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच केंद्रीय स्तरावर बैठका घेऊन महाराष्ट्राची प्रबळ दावेदारी त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मांडली. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, जमीन, विजेची सोय, इतर सवलती याविषयी सर्व विभागाशी विचारविनिमय करून रेल्वे मंत्रालयाला कळविण्यात आले. गरज पडल्यास या प्रकल्पास आवश्यक तो निधी देण्याचा देखील तयारी त्यांनी दर्शवली.

अखेर सर्व विभागांच्या आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश आले व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे कोच प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे घोषित केले. मराठवाड्यासाठी ही जितकी आनंदाची बाब होती तितकीच ती महाराष्ट्रासाठी देखील होती. रेल्वे मंत्रालयाकडून उभारण्यात आलेले हा संपूर्ण देशातील चौथा व महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये थेट गुंतवणूक आली, उद्योग क्षेत्रामध्ये राज्याने एक नवी झेप घेतली. भविष्यात या कारखान्यात निर्माण होणाऱ्या रेल्वे या जगभरात जातील व यामुळे राज्याचे आणि मराठवाड्याचे नाव जागतिक बाजारपेठेत पोहोचेल.

मराठवाड्याच्या या स्वप्नपूर्तीचे खरे शिल्पकार हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबच आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मराठवाड्यातील जनतेच्या भावना त्यांच्या जवळ बोलून दाखवलेल्या आणि आदरणीय देवेंद्रजींनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवलेले. एक सर्वसमावेशक नेता म्हणून त्यांनी यावेळी आम्हा सर्वांना घेऊन जे कार्य केले, त्याचे फळ म्हणजे हा कारखाना व मराठवाड्याचा भविष्यातील भाग्योदय आहे.