दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न !

दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न !
केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालय व‌ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करण्यात आलेल्या ८,७९७ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
अलिम्को कानपुर, जिल्हा परिषद, लातूर व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथे १,६०६ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
प्रत्येक दिव्यांग बांधवाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता आले पाहिजे, हे आमच्या तीर्थरुपांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी आमच्या मातोश्रींनी “अक्का फाउंडेशन”च्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले.
गेल्या तीन वर्षांपूर्वी पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना ही संकल्पना संवेदनाचे श्री.सुरेशजी पाटील यांनी मांडली होती. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण ३ डिसेंबर २०१७ पासून कार्य सुरू केले होते. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा प्रवाह पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. दिव्यांग बांधवांनाही सक्षम करून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा पद्धतीच्या योजना सुरू केल्या आहेत.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाल्याबद्दल विशेष समाधान वाटते आहे. लातूर जिल्ह्यातील ८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होणार असल्याने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविणारा देशातील हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे.