Loading...

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर

लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. स्व. दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर तसेच दादांचे लाखो अनुयायी येत्या ९ तारखेला आपल्या निलंगानगरीत येणार आहेत. त्यामुळे यासर्वांच्या सोयीसाठी व कार्यक्रमाची शोभा वाढविणारा भव्य-दिव्य मंडप महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात उभारला जात आहे. दरम्यान या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांशी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकरावजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमारजी पाटील निलंगेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भागवतजी पौळ सर, शिक्षण संस्थेचे दिलीपजी धुमाळ, भरतजी गोरे, पी. पी.गायकवाड जी तसेच कॉलेजचे कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.