drushti abhiyan 2.0

दृष्टी अभियान 2.0

ग्रामीण नेत्रआरोग्याची चळवळ बनलेल्या ‘दृष्टी अभियाना’च्या पहिल्या टप्प्याच्या भरघोस यशानंतर दृष्टी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जनसेवेच्या भावनेतून सुरु करण्यात आलेल्या या सेवाकार्याचे जनचळवळीत झालेले हे रुपांतर हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील नेत्रविषयक समस्या मुळापासून दूर करण्यासाठी अक्का फाऊंडेशन दृष्टी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून हा दुसरा टप्पा दि. १७ सप्टेंबर ते २५ डिसेंबर (अटलजी जयंती) या दरम्यान राबविण्यात येणार आहे.