

निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार मा. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर व देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील नेत्रविषयक समस्यांवर शाश्वत उपाय म्हणून अक्का फाऊंडेशनद्वारे ‘दृष्टी अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २० जून ते १७ सप्टेंबर या कालावधीत निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकूण… गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमार्फत अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल अकरा हजाराहून अधिक नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. याचबरोबर तीन हजाराहून अधिक नागरिकांना मोफत चष्मेवाटप व दोन हजाराहून अधिक नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.