मॅन बिहाइंड आनंदी

Loading Events

« All Events

मॅन बिहाइंड आनंदी

June 4, 2022 @ 12:00 am - June 14, 2024 @ 12:00 am

project anandi

4 June 2022 : स्त्रीवाद म्हणजे काय? फक्त महिलांनी महिलांच्या हक्कासाठी लढणं म्हणजे स्त्रीवाद का? आपल्या न्याय हक्कासाठी दरवेळी फक्त स्त्रीनेच आवाज उठवणे म्हणजे स्त्रीवाद का? तर नाही. खरा स्त्रीवाद म्हणजे महिलांसोबतच पुरुषांनी तिच्या हक्कासाठी पुढाकार घेणे म्हणजे खरा स्त्रीवाद. सर्व समाजाने मिळून महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे म्हणजे स्त्रीवाद. भारतीय इतिहासामध्ये अनेकदा महिलांच्या हक्कासाठी पुरुषांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याचे फळ म्हणजे आज महिलांना अनेक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु इथेच सगळं थांबला का? तर नाही. परत एकदा एक पुरुष महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावला आहे.
महिला तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारात ‘अक्का फाउंडेशन’ची स्थापना झाली. महिला सक्षमीकरणासाठी आदरणीय अक्का या कायम प्रयत्नशील असतात. परंतु प्रोजेक्ट आनंदी हा उपक्रम हा एका पुरुषाच्या पुढाकारातून साकारला असून आपल्या मतदारसंघातील स्त्रियांच्या आरोग्यासाठी निस्वार्थ भावनेतून हा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी महिला व पुरुषांमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निलंगा, शिरूर-अनंतपाळ व देवणी या तीन तालुक्यातील महिलांना आपल्या आमदार मासिक मानधनातून सॅनेटरी पॅड तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

प्रोजेक्ट आनंदी विषयी बोलताना ते म्हणतात, “मी खरंच भाग्यवान आहे कि माझ्या घरात चार मुली आहेत. पण याचबरोबर मतदारसंघातील सर्व मुली या देखील माझ्या कुटुंबातील मुली आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे तसेच मासिक पाळी दरम्यान त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना योग्य साहित्य उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे.”

मासिक पाळी हा सर्वांच्या जवळचा तसेच महत्त्वाचा विषय आहे. परंतु मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलण्याइतका समाज अजूनही प्रगल्भ झालेला नाही. प्रोजेक्ट आनंदी हा समाजामध्ये नवी जागरूकता आणण्याची एक अभिनव मोहीम आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी एका पुरुषाने घेतला पुढाकार हाच खरा स्त्रीवाद आहे. या मोहिमेमध्ये आपण ही सामील होऊ या, तिच्या हक्कासाठी एक पाऊल टाकूया!

Details

Start:
June 4 @ 12:00 am
End:
June 14, 2024 @ 12:00 am
Website:
akkafoundation.com/anandi/