हिरकणी महाराष्ट्राची ही योजना राज्याची नवी ओळख बनेल.

ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन त्यांच्या अभिनव व्यावसायिक संकल्पनांना उत्तेजन देण्यासाठी ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेची सुरुवात झाली.

याची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर येथून झाली आहे. लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ७०० हुन अधिक बचत गटांनी यात भाग घेतला. विजयी गटांना त्यांच्या त्यांच्या व्यवसाय विकसित करण्यासाठी ५० हजार रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. तर जिल्हा स्थरावरील सर्वोत्कृष्ट दहा बचत गततांना प्रत्येकी २ लाख रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.