Loading.

हिवाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील #हिवाळी_अधिवेशनात लातूर येथील #महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या धरतीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनवून त्याठिकाणी ७२ फुटी पुतळा उभा करण्यात यावा. यासाठी राज्य सरकारच्यावतीने परवानगी देऊन आवश्यक तो निधी मंजुर करण्यात यावा, असा हा प्रस्ताव मांडला. यानिमित्त आंबेडकरी चळवळतील समाजबांधवांनी सत्कार केला.

केवळ स्मारक उभे करावे अशी मागणी करून माझी जबाबदारी संपली नसून यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा व निधीची उपलब्धता करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. हा निधी निश्चितच मंजूर होईल असा विश्वास दिला. यानिधीच्या माध्यमातून देशातील सर्वोकृष्ट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आवाहन केले. याबाबत आपल्या सूचनाही देण्यात याव्यात असेही सांगितले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथजी आल्टे, अर्चनाताई अल्टे, व्ही. एस. पँथरचे विनोदजी खटके, माजी नगरसेवक हणमंतजी जाकते, लालाजी सुरवसे, विजयजी अवचारे, महेशजी कौलखेरे, संगीतजी रंदाळे, दिलीपजी गायकवाड, संजयजी सोनकांबळे, निखिलजी गायकवाड, बाबाजी गायकवाड, पप्पूजी सरवदे, एन.डी. सोनकांबळे जी, अक्षयजी नावडे, विलासजी सखरे, मंगेशजी सोनकांबळे, भैय्या वाघमारे जी, गोविंदजी कांबळे, प्रतिकजी कांबळे आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.