जिल्हास्तरीय बिझनेस प्लान कॉम्पिटीशन

जिल्हा स्तरावर उद्योजक आणि नवकल्पनांना एक व्यासपीठ प्रदान करून देत, स्टार्टअप इकोसिस्टम यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी, जिल्हास्तरीय बिझनेस प्लान कॉम्पिटीशन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला असून, नाविन्यपूर्ण बिझनेस प्लान असणाऱ्या, संकल्पना राबविण्यास ठोस कागदपत्रांसहित असलेल्या उद्योजकास या कल्पनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून ५ लाख इतक्या रकमेची वर्क ऑर्डर देण्यात आली. अशाच प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत.