जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना किमान रु.२७५० हा भाव मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि कारखानदारांना झोप लागू देणार नाही!!!
मांजरा परिसरातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे एफ.आर.पी. प्रमाणे बील तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करावे या न्याय्य मागणीसाठी, लातूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.रमेशअप्पा कराड जी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, माजी समाजकल्याण सभापती तथा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, श्री.शेषरावजी मामले सर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, शहर संघटन सरचिटणीस श्री. मनीषजी बंडेवार, प्रदेश भाजयुमोच्या श्रीमती प्रेरणाताई होनराव, श्री.साहेबराव मुळे जी, श्री.प्रदीपजी पाटील खांडापुरकर, श्री.विक्रमजी शिंदे, श्री.ज्योतीरामजी चिवडे आदी मान्यवर तसेच जिल्हा भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.