बाराळीऔराद विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कॅबिनेट मंत्री प्रभूजी चव्हाण यांच्या प्रचारात काल #कमलनगर येथे जाहीर सभा घेतली.
‘सब का साथ, सब का विकास’ हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मूलमंत्र घेऊन पुढे जात असलेल्या प्रभूजींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून मतदारसंघातील अनेक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला. आपला मतदारसंघ आज विकासाच्या वाटेवर अत्यंत गतीने पुढे जात आहे, विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आपल्या मतरुपी आशीर्वादाने प्रभूजींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी माजी आमदार गोविंदजी केंद्रे, माजी जि.प. सभापती बापूरावजी राठोड, जिल्हा संघटनमंत्री अरीहंतजी, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्रजी तिरूके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेते, माजी आमदार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.