केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमितजी शाह यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या बळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे.
पक्ष संघटन असो, देशाचा विकास असो अथवा राष्ट्राच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असो प्रत्येक वेळी सर्वस्वपणाला लावून आणि झोकून देऊन कार्य करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे.
देशाची एकात्मता अबाधित राहण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन सक्षम निर्णय त्यांनी घेतले. राष्ट्र प्रथम या भावनेतून त्यांचे अविश्रांत कार्य सातत्याने चालू असते म्हणूनच देश सुरक्षित हातात असल्याची भावना देशवासियांमध्ये आहे.
त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू राहावे त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा…