लातूर आणि निलंगा येथे ऑक्सिजन बँकेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण !

लातूर आणि निलंगा येथे ऑक्सिजन बँकेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण !
केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटकाळात जेथे रुग्ण तेथे सेवा पोहोचविण्याचा पॅटर्न निर्माण केला आहे. या पॅटर्नमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असून अनेकांना वेळेवर उपचार उपलब्ध झाले आहेत. हाच पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबविण्याचा आपण संकल्प केला आहे…
केंद्रीय मंत्री माननीय श्री.नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथे तसेच लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन बँकेस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकार्पण करण्यात आले. सर्वसामान्यांच्या संकट काळात सेवाभाव जोपासला जावा असे केंद्रीय मंत्री माननीय श्री.नितीनजी गडकरी यांनी आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकार्पण, तसेच विविध रुग्णालयांमध्ये बायोपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.विकासजी माने, तहसीलदार श्री.गणेशजी जाधव, निलंगा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस.एस.सोळुंके, खादी ग्रामोद्योगचे चेयरमन श्री.दगडुजी सोळुंके, डॉ.लालासाहेबजी देशमुख, मनपाचे गटनेते अॅड.शैलेशजी गोजमगुंडे, जि.प.उपाध्यक्षा सौ.भारतबाई सांळूके, युवानेते श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.अजितजी पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंडीतजी सुकनीकर, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री.अमोलजी गिते, अॅड.गणेशजी गोजममुंडे, श्री.सागरजी घोडके, श्री.अभिजीतजी मुनाळे, श्रीमती पुनमजी पांचाळ, श्रीमती राजश्रीजी होनाळे, अॅड.श्री.पंकजजी देशपांडे, श्री.नितीनजी हसाळे, श्री.गजेंद्रजी बोकन, श्री.संतोषजी तिवारी, श्री.यशवंतजी कदम, श्री.रविजी लवटे, श्री.प्रेमजी मोहिते, नगरसेवक डॉ.किरणजी बाहेती, श्री.आकाशजी बजाज, परिचारिका श्रीमती भाग्यश्रीताई काळे व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.