Loading...

लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आमदार श्री.अभिमन्यूजी पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होतो.

लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आमदार श्री.अभिमन्यूजी पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होतो.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असलेला निधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनेसाठी वापरत असताना त्यात कुठलाही गैरव्यवहार होऊ नये, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. तसेच दुसऱ्या लाटेच्या वेळी विविध सामान खरेदी करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, सदर चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, अशी मागणी केली.
महावितरणकडून शेतकऱ्यांना जुलमी वागणूक मिळत आहे. या अनुषंगाने गेल्या बैठकीत शेतकरी बांधवांना तात्काळ रोहित्र बसवून देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने पाणी असून देखील शेतकरी बांधव आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नाही अशी दुर्दैवी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे रोहित्र व ऑइलसाठीचा भरीव निधी तात्काळ मंजूर व्हायला हवा.
ऑफिसर्स क्लबला देण्यात आलेला ६० लाखांचा निधी शेतकरी बांधव व सामान्य जनतेच्या हितासाठी वापरणे योग्य ठरेल. तसेच आरोग्य व शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या निधीमध्ये अफरातफरी न होता खर्च व्हावा, अशी सूचना केली.
केंद्र शासनाने लातूरसाठी मंजूर केलेल्या अदयावत १०० खाटांच्या मदर-चाइल्ड हॉस्पीटसाठी गेल्या २ वर्षापासून जागेची प्रतिक्षा आहे यासाठीचे 36 कोटी रुपये निधी पडून आहे. तो परत जाण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील माता व बालकांना चांगल्या अत्याधुनिक शासकीय आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागेल.