लातूर जिल्ह्यासाठी समर्पित, अक्का फाऊंडेशन – लसीकरण टास्क फोर्सचा “सेवा संकल्प मेळावा” ऑनलाईन वेबिनार मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

लातूर जिल्ह्यासाठी समर्पित, अक्का फाऊंडेशन – लसीकरण टास्क फोर्सचा “सेवा संकल्प मेळावा” ऑनलाईन वेबिनार मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रकारे कार्य करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.
जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करत जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकाचे लसीकरण होईपर्यंत ही टास्क फोर्स कार्य करणार आहे.
लातूर जिल्ह्यातील सुमारे ७५८ वॉरियर्स यासाठी कार्यरत असून, त्यांची संख्या सातत्याने वाढती राहिली आहे. हे सर्व वॉरियर्स मा. श्री. देवेंद्रजींच्या समक्ष या कार्यासाठी संकल्पबद्ध झाले.
भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी-माजी आमदार आणि नेतृत्वाने देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यास प्रोत्साहन दिले.
या टास्क फोर्समुळे लातूर जिल्ह्यात सुरक्षित आरोग्यासाठी सामाजिक क्षेत्रात एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे.