Latur Rail Coach Factory

लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पहिली कोच शेल तयार झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल यांनी विशेष दखल घेऊन हे ऐतिहासिक क्षण प्रकाशित केले आहेत

आपल्या लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पहिली कोच शेल तयार झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल यांनी विशेष दखल घेऊन हे ऐतिहासिक क्षण प्रकाशित केले आहेत.
सुशासन दिवस अर्थात स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ही पहिली कोच शेल पूर्णत्वाने साकारण्यात आली आहे.
आपल्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. रोजगार निर्मिती, व्यवसाय वृद्धी आणि आत्मनिर्भरता प्रदान करणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात आपल्या लातूर जिल्ह्यासाठी निश्चित आशादायी आहे. मराठवाड्यात मोठा प्रकल्प उभा राहिल्याने सुशिक्षित युवक मराठवाडा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचे प्रमाण यामुळे कमी होणार आहे. एकंदरीत मराठवाड्याच्या विकासामध्ये यामुळे मोलाची भर पडणार आहे.