लातूर जिल्ह्यातील सुमारे १०२३ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न !!

लातूर जिल्ह्यातील सुमारे १०२३ कोटींच्या ऐतिहासिक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते संपन्न !!!
अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्स्ड कॉन्क्रीट (UHPFRC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेला देशातील पहिला वैशिष्ट्यपूर्ण पूल हा आपल्या लातूर जिल्ह्यात निर्माण करण्यात आला आहे. लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. हा रस्ता चारपदरी करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. या कार्यामुळे लातूरमध्ये विकासाचा महामार्गच खुला होईल, हे निश्चित आहे.
यावेळी आदरणीय अक्का अर्थात मा.खा.श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, राज्यमंत्री श्री.संजयजी बनसोडे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुधाकरजी भालेराव, माजी आमदार श्री.विनायकराव पाटील जी, प्रदेश प्रवक्ते श्री.गणेशजी हाके, राष्ट्रीय किसान मोर्चाचे सदस्य श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर जी, माजी आमदार श्री.गोविंदअण्णा केंद्रे जी, किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री.दिलीपरावजी देशमुख, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्री.शैलेशजी लाहोटी, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, माजी आमदार श्री.बब्रुवानजी खंदाडे, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष श्री.दगडूजी साळुंके, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, मनपा गटनेते श्री.शैलेशजी गोजमगुंडे, महानगर पालिका सभापती श्री.दीपकजी मठपती, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीमती जयश्रीताई पाटील, डॉ.श्री.संजयजी जगताप, श्री.लालासाहेब देशमुख जी, आमदार श्री.बाबासाहेब पाटील जी, श्री.गोपाळरावजी पाटील, डॉ.श्री.सुनीलजी गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थिती सह हजारो नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता.