लातूर येथे भाजपा नेते तथा माजी खासदार श्री.किरीटजी सोमय्या यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यांचे दस्तावेज त्यांच्याकडे सुपूर्द केले.
लातूर जिल्हा बँकेत लोकशाहीचा खून झालेला आहे. सत्ताधाऱ्यांना बँकेच्या निवडणुकीत आपला पराभव समोर दिसताच त्यांनी अवैधरित्या भाजपाचे सर्व उमेदवार बाद केले. त्यांनी हे उमेदवार बाद का केले ? नेमकं काय घडलं ? याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. न्यायालयीन लढाई लढू, सभासदांचे मेळावे घेऊ, मात्र अशा प्रकारे लोकशाही नष्ट होऊ देणार नाही.
लातूर ही पवित्र भूमी आहे आणि या भूमीला आम्ही असे अपवित्र होऊ देणार नाही हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे. जिल्हा बँकेत असलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी ही आमची आग्रही मागणी आहे.
यावेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, माजी आमदार श्री.विनायकरावजी पाटील, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे पदाधिकारी, पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.