लातूर येथे केंद्रीय मंत्री श्री.भगवंतजी खुबा यांच्या नेतृत्वात लातूर शहर व जिल्हा भाजपाची बैठक संपन्न झाली.

लातूर येथे केंद्रीय मंत्री श्री.भगवंतजी खुबा यांच्या नेतृत्वात लातूर शहर व जिल्हा भाजपाची बैठक संपन्न झाली.
लातूर येथे केंद्र शासनाच्या निधीतून उभ्या राहिलेल्या सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलला माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांचे नाव देऊन लवकरात लवकर लोकार्पण सोहळा संपन्न व्हावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्व घटकातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन श्री.खुबा यांनी केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, शहर जिल्हा सरचिटणीस श्री.शिरीषजी कुलकर्णी, सरचिटणीस श्री.दिग्विजयजी काथवटे, श्रीमती शोभाताई पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीमती जयश्रीताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री.ज्योतिरामजी चिवडे, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.