Loading...

लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिली.
संघटनेच्या विविध मागण्या जाणून घेत यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तसेच यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.प्रविणजी दरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून आंदोलनकर्त्यांसमोर मागण्यांबाबत चर्चा केली. याविषयी माहिती घेत असून भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे तुमच्या बरोबर असल्याचा विश्वास त्यांनी सर्व आंदोलनकर्त्या बांधवांना दिला.
गेली २ वर्षे वैद्यकीय क्षेत्राचे महत्व व योगदान अधिक ठळकपणे जगासमोर आले आहे. अजूनही सदर संकट पूर्णपणे टळलेले नसताना वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांना आंदोलन करावे लागणे अतिशय दुर्दैवी असून सरकारचा नाकर्तेपणा पुन्हा उघडा पाडणारा आहे. तसेच संघटनेचे शिष्टमंडळ त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिवांकडे गेले असता त्याठिकाणी त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याबाबत आगामी अधिवेशनात आवाज उठवून सचिवांना पदमुक्त करून वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांना दिला.
यावेळी वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.डॉ.उदयजी मोहिते पाटील, संघटनेचे लातूर शहराध्यक्ष श्री.डॉ.उमेशजी कानडे, सचिव श्री.डॉ.गणेशजी बंदखडके, श्री.डॉ.शैलेंद्रजी चव्हाण, श्री.डॉ.डोपे जी, श्री.डॉ.बनसोडे जी, श्री.डॉ.छाबडा जी, श्री.डॉ.होळीकर जी, श्री.डॉ.कंदाकुरे जी, श्री.डॉ.रामजी मुंडे, डॉ.होळंबे मॅडम, अन्य वैद्यकीय शिक्षक, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, भाजपा प्रदेश प्रवक्ता प्रेरणाताई होनराव, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्री.अजितजी पाटील कव्हेकर, मनपा गटनेते श्री.शैलेशजी गोजमगुंडे, मनपा सभापती श्री.दीपकजी मठपती, नगरसेवक, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.