मा.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद

मा.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद : निलंगा वासीयांची रक्तदानातून शासनास मदत..!

लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मा.जिल्हाधिकारी, लातूर यांनी रक्तदानासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे आमचे बंधू श्री.अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतः रक्तदान करत या मोहिमेची सुरुवात केली.

या मोहिमेसाठी तब्बल ४०० जणांनी नोंदणी केली असून, रक्ताची आवश्यकता भासल्यास नोंद केलेल्या नागरिकांना त्या त्या ठिकाणी रक्तदानास पाठविण्यात येईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेली काळजी घेऊन यातील प्रत्येक व्यक्ती दोन वेळेस रक्तदान करणार आहे. त्याबाबत आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी आवश्यक ती काळजीही घेतली आहे.