महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंहजी कोश्यारी यांच्याकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ प्रकरणी कलम १९७ नुसार बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास परवानगीचे निवेदन पत्र सादर करण्यात आले.

महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंहजी कोश्यारी यांच्याकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ प्रकरणी कलम १९७ नुसार बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास परवानगीचे निवेदन पत्र सादर करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी सुरु असलेल्या निवडणुक प्रक्रियेत शासकीय अधिकार्यांनी बनावट कागदपत्रे व शिक्के यांचा वापर करून खोटे दस्तावेज तयार केले, असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या आधारे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणार्या सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधीत शासकीय अधिकार्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ अनुसार परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भाजपा शिष्टमंडळाने केली आहे.
काँग्रेस प्रणित पॅनेलच्या विरोधात भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनलच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. मात्र छाननी प्रक्रियेत भाजपा प्रणित पॅनलच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे. याकरिता सत्ताधारी काँग्रेसने सत्तेचा गैरवापर करत प्रशासनाला हाताशी धरून कटकारस्थान रचलेले होते, असे दिसत आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्युजी पवार, श्री.धर्मपालजी देवशेट्टे, श्री.विक्रमजी शिंदे, श्री.बाबुरावजी खंदाडे, श्री.अमोलजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.