महाराष्ट्राचे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची कर्मभूमी असलेल्या रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
मुंडे साहेब नेहमीच शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी लढत असत. त्यांनी एक परंपरा आपल्याला दिली आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे कार्य पार पडले. मात्र मिळालेली मदत ही तुटपुंजी आहे. संपूर्ण मदत मिळवून देणे तसेच खरवडून गेलेल्या जमिनीसाठी योग्य तो मोबदला मिळाला नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशारा यावेळी दिला.
याप्रसंगी खासदार श्री.सुधाकरजी श्रृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्युजी पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड.दशरथजी सरवदे, श्री.दिलीपजी देशमुख, आमदार श्री.बब्रुवानजी खंदाडे, श्री.विक्रमजी शिंदे, उपनगराध्यक्ष श्री.अभिषेकजी आकनगीरे, श्री.रवीजी औसेकर, श्री.अमोलजी पाटील, श्री.राजेशजी कराड, पंचायत समितीच्या सभापती सौ.बायनाबाई साळवे, उपसभापती श्री.अनंतजी चव्हाण, श्री.सुरेंद्रजी गोडभरले, श्री.महेंद्रजी गोडभरले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.साहेबरावजी मुंढे आदींची उपस्थिती होती.