महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली.

महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली.
मीटर लाऊन २४ तास पाणीपुरवठा यामुळे शक्य होणार आहे तसेच प्रत्येकाला आवश्यकतेनुसार मुबलक पाणी यामुळे उपलब्ध होणार आहे.
निलंगा शहरात लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी लवकरात लवकर या अद्ययावत यंत्राने नुसार नळ – जोडणी नागरिकांनी करून घ्यावी..
ही एक आदर्श सुरुवात आहे.. लवकरच जिल्ह्यात सर्वदूर आणि मुख्यत्वेकरून लातूर येथे अशी संकल्पना राबविण्यात येईल आणि त्यासाठी पाण्याची उपलब्धता करण्याची योजना देखील कार्यान्वित करण्यात येईल.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष श्री. बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री. मनोज कोळ्ळे जी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मल्लीकर्जूनजी पाटील, पाणीपुरवठा सभापती श्रीमती इशरतबी सौदागर जी, जल प्राधिकरणाचे श्री. खरवसेकर जी, चेअरमन श्री. दगडूजी साळुंखे, पंचायत समिती माजी सभापती श्री. अजित माने जी आदी मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.