माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण ही त्यांच्या भव्य कार्यास निलंगावासियांची मानवंदना!

माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण ही त्यांच्या भव्य कार्यास निलंगावासियांची मानवंदना!
स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्य आणि जपलेली सांस्कृतिक मूल्ये ही अनेक पिढ्यांसाठी लाभदायक ठरतील अशी आहेत. त्यांच्या निलंगा शहरातील ही अत्याधुनिक भव्य वास्तू देखील पुढील अनेक पिढ्यांसाठी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचे व विचारांच्या आदान प्रदान करण्याचे दालन ठरेल, असा विश्वास वाटतो. या सभागृहात कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम आयोजित होऊ नये असा ठराव घेण्यात यावा असे नगरपालिकेला आवाहन केले.
त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या भव्य सभागृहाचे नामाभिधान ठरविणे ही त्यांच्या विशाल कार्यास निलंगावासियांची अल्पशी मानवंदना ठरेल. त्यांच्या विकास केंद्रित विचारांचे पाईक होऊन कार्य करण्याचा प्रयत्न कायम आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, श्री.शेषरावजी ममाले सर, सभापती सौ.राधाताई बिराजदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी बाहेती, डॉ.भागवतजी पोळ सर, श्री.दिलीपजी धुमाळ सर, श्री.शिरमले सर, डॉ.लालासाहेब देशमुख, मुख्य अधिकारी श्री.सुंदरजी बोंदर आदी मान्यवरांसह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.