माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने ‘अटल वॉक-वे’ या अभिनव पार्कचे लोकार्पण संपन्न झाले.

माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने ‘अटल वॉक-वे’ या अभिनव पार्कचे लोकार्पण संपन्न झाले.
महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा वॉक-वे सुरू करण्यात आला आहे. निलंगावासियांसाठी हा अभिनव प्रकल्प अस्तित्वात यावा अशी संकल्पना अनेक वर्षांपासून मनात होती.
कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जाण्यासाठी समर्पित भावनेने झटणारे एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व त्या कार्यात असावे लागते. ‘अटल वॉक-वे’ची संकल्पना साकारण्यासाठी निलंगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे जी यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीने याचा लाभ मिळावा, तसेच अप्रतिम अशी कलाकृती उभी राहावी यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या पुढाकारानेच स्व.अटलजींच्या नावाला शोभेल अशा वॉक-वेचे निर्माण झाले.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ‘फिट इंडिया’ची संकल्पना देशासमोर मांडली. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच सशक्त भारत घडवण्यासाठी प्रत्येक गाव सशक्त असणे आवश्यक आहे. या भावनेतून ‘फिट निलंगा’साठी या वॉक-वेचे निर्माण करण्यात आले. सर्व वयोगटातील नागरिकांना याचा लाभ घेता यावा याच उद्देशाने याची उभारणी करण्यात आली आहे.
स्व.अटलजींच्या नेतृत्वाकडे असणारी ऊर्जा व सकारात्मकता सदर वॉक-वे नागरिकांना देईल!