मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज लातूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हुतात्मा स्मारक येथे स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून ध्वजारोहण केले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वॉटर ग्रीड योजनेला मान्यता दिलेली असून, यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन केले.
गणेश विसर्जनाचा “लातूर पॅटर्न ” निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी केला. तसेच या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपिता, वीर पत्नी यांची भेट घेऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार या सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर श्री.सुरेशजी पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मिलिंदजी लातूरे, जिल्हाधिकारी श्री.जी. श्रीकांतजी, महापालिका आयुक्त श्री.एम.डी. सिंहजी, पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्रजी माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिनजी इटनकर,अप्पर जिल्हाधिकारी श्री.अविनाशजी पाठक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री.हिंमतजी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.अनंतजी गव्हाणे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.