म्युकरमायकोसीस फंगल इन्फेक्शनच्या उपचाराची सुविधा शहरातच व्हावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले !

म्युकरमायकोसीस फंगल इन्फेक्शनच्या उपचाराची सुविधा शहरातच व्हावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले !
कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसीस या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्याच्या परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील जवळपास १०० रुग्णांवर उपचार चालू आहेत. हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता प्रशासनाने घ्यावी.
मधुमेह असणारे तसेच कोरोना उपचार करताना ऑक्सिजन व इतर औषधांचा वापर केलेल्या रुग्णांची यादी जिल्हा प्रशासनाकडे असेल. त्याआधारे सगळ्यांची तपासणी करून तात्काळ उपचार सुरू करावे. यामध्ये जिल्हा भाजपा आणि अक्का फाऊंडेशन पूर्णपणे साहाय्य करण्यास तयार आहे. असे निवेदन जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराजजी बी.पी. यांना निवेदन दिले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार श्री.रमेशजी कराड, जि.प.अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, मनपाचे गटनेते अॅड.शैलेशजी गोजममुंडे, युवा नेते श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, श्री.दगडूजी साळुंखे, श्री.रोहितजी पाटील, श्री.अनिलजी भिसे, डॉ.बाबासाहेबजी घुले, श्री.आनंदजी चव्हाण, श्री.सुरजजी शिंदे, श्री.श्यामसुंदरजी वाघमारे आदींची उपस्थिती होती.