नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन ४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले

रुग्णवाहिका हीच आशादायक आरोग्याची गुढी !
आपल्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन ४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना आवश्यक सेवा मिळवून देण्यासाठी प्राण वाचवणारी तसेच तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकारी होणारी रुग्णवाहिका ही आजची गरज आहे.
या ४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण डॉ. सौ. समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यातील २ रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालय, निलंगा; १ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय, शिरूर आनंतपाळ आणि १ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोळ या शासकीय दवाखान्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे, उपाध्यक्ष सौ. भारतबाई साळुंके, विभागीय अधिकारी श्री. विकासजी माने, तहसीलदार श्री. गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री. ताकभाते जी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. प्रल्हादजी साळुंके, डॉ. दिनकरजी पाटील, डॉ. भाग्यश्री ताई काळे, निलंगा नगरपालिकेचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री. बाळासाहेबजी शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. बापूराव राठोड जी, चेअरमन श्री. दगडू साळुंखे जी, श्री. शेषराव ममाळे जी, उपाध्यक्ष श्री. मनोज कोळ्ळे जी, नगरसेवक डॉ. किरण बाहेती जी, सभापती श्री. महादू फट्टे जी, नगरसेवक श्री. शंकरजी आप्पा बुरके, श्री. अरविंदजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.