निलंगा बूथप्रमुख मेळावा प्रसंगी “मिशन 1 लाख +” या संकल्पनेस मोठा प्रतिसाद

लोकशाहीला बळकट करणे म्हणजे देशाला ताकद देणे. विकासाचे विषय, विकासाचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे निवडणुका हे साधन आहे. राष्ट्रहित प्रथम या तत्वावर काम करणारी आपली भारतीय जनता पार्टी.. आणि यासाठीच कार्य करणारे आपण समर्पित कार्यकर्ते.. नव महाराष्ट्राचे नव संकल्प घरोघरी पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. यातील पहिला संकल्प म्हणजे दुष्काळ निवारण.. आपल्या लातूर जिल्ह्यातील गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी केलेल्या योजना नागरिकांना सांगणे आणि त्यांचा या कार्यात सहभाग आणि सहकार्य करून घेतल्यास दुष्काळाच्या संकटांचे समूळ उच्चाटन पुढील पाच वर्षांत होऊ शकते.

बुथप्रमुख मेळावा अंबुलगा आणि हलगरा येथील बूथ प्रमुखांचा मेळावा घटस्थापनेच्या शुभदिनी अशा संकल्पसह मोठ्या उत्साहात पार पडला.

बुथप्रमुख मेळावा,अबुंलगा जि.प.सर्कल (स्थळ : अबुंलगा) येथे विधानसभा निरिक्षक श्री.राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.संजय दोरवे, पं.स.सभापती (निलंगा) श्री.अजित माने, जि.प.सदस्य श्रीमती भारतबाई सांळुके, पं.स सदस्य श्री.राजकुमार सोमवंशी, श्री.हरीभाऊ काळे, कृ.उ.बा सभापती श्री.प्रदीपकुमार पाटील(औराद शहाजनी ), श्री.गुडेराव जाधव, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष श्री.मनोज कोळ्ळे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख तसेच बुथप्रमुख मेळावा, हलगरा जि.प सर्कल (स्थळ : हलगरा) येथे
विधानसभा निरिक्षक श्री.राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.संजय दोरवे, पं.स.सभापती (निलंगा)श्री.अजित माने, कृ.उ.बा.सभापती श्री.प्रदीपकुमार पाटील(औराद शहाजनी ), श्री.गुडेराव जाधव, सरपंच श्रीमती अनुसया खांडेकर, उपसरपंच श्री.अंबादास जाधव, श्री.दुष्यंत सगरे, श्री.लक्ष्मण शेळके, श्री.नरसिंग बिरादार, श्री.मधुकर पाटील, श्री.शाहुराज थेटे,नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख आदी उपस्थित होते.