निलंगा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आनंद मुनी चौक, निलंगा येथील नगरपालिका व्यापारी संकुलात निलंगा तालुका पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालय सुरू झाले. समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या पत्रकार बांधवांना अडचण आली, तर एक मदतीचा हात म्हणून पत्रकार संघ मोलाची भूमिका बजावत असतो. तालुक्यातील पत्रकारांना संपर्क करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता होती. आगामी काळात पत्रकार संघाची इमारत असावी, ज्यायोगे पत्रकारांच्या हिताची कामे मार्गी लागू शकतील, असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष श्री. बाळासाहेबजी शिंगाडे. पंचायत समिती माजी सभापती श्री .अजितजी माने, चेअरमन श्री. दगडुजी साळुंखे, भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस श्री. संजयजी दोरवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. राम काळगे जी, सचिव श्री. झटिंग म्हेत्रे जी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मल्लिकार्जुनजी पाटील तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
