निलंगा तालुक्यात दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यात दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
औराद – शहाजनी येथील ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे डेडिकेटेड कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले, तसेच निलंगा मधील सुश्रुत रुग्णालय येथे २० बेडचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
यानंतर औराद ग्रामपंचायतीला भेट देऊन सर्व ग्रामस्थांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. एकजुटीने लढा दिल्यास आपल्याला त्यावर विजय मिळविता येणार आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा आणि कार्य सुरू आहे पण रुग्णांशी संबंधित कुटुंबियांना योग्य तो आधार देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचे मनोधैर्य वाढले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कोव्हीड सेंतरसाठी प्रयत्न केल्याने अत्यंत कमी वेळेत हे कार्य पूर्ण झाले आहे. हीच एकजूट या संकटावर मात करण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे.