निलंगा उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी करुन ज्यांना लस देण्यात आली आहे, त्यांची चौकशी केली.‌

निलंगा उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी करुन ज्यांना लस देण्यात आली आहे, त्यांची चौकशी केली.‌
दिनांक २५ व २६ रोजी दररोज १२० लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी पहिल्या दिवशी ६७, दुसऱ्या दिवशी भेटी दरम्यान २० जणांचे लसीकरण संपन्न झाले आहे. आतापर्यंत एकूण ८७ जणांचे लसीकरण झाले असून यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांना लस देण्यात येत आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदाळे यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, प्रतिष्ठित व्यापारी श्री.संतोषजी लांबोटकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.रामभाऊजी काळगे आदींची उपस्थिती होती.