निलंगा येथील बस आगारात सुरू असलेला ‘लढा विलीनीकरणाचा’ या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

निलंगा येथील बस आगारात सुरू असलेला ‘लढा विलीनीकरणाचा’ या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे राज्य सरकारच्या शासकीय सेवेत विलीनीकरण होणे, त्याचबरोबर कर्मचारी बांधवांच्या वेतनश्रेणीत वाढ होऊन किमान वेतन २४ हजार होणे आवश्यक आहे. एस.टी. कर्मचारी दिवसरात्र काम करून जनतेची सेवा करतात याचा मोबदला म्हणून राज्य शासनाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा.
याप्रसंगी निलंगा तालुक्याचे तहसीलदार श्री.गणेशजी जाधव, चेअरमन श्री.दगडुजी साळुंखे, श्री.शेषरावजी मम्माळे, श्री.किशोरजी जाधव आदींची उपस्थिती होती.