निलंगा येथील निवासस्थानी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

निलंगा येथील निवासस्थानी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
नगरपरिषदेची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लढत आहोत. त्यामुळे आपल्याला राजकारण बाजूला सारून निवडणुकीत जनतेचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
या निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या प्रभागात, वॉर्डात पक्ष, संघटना बांधणीसाठी आतापासून कार्य करणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, रिपाई आठवले गटाचे श्री.अंकुशजी ढेरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शेषरावजी मम्माळे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, भाजपा निलंगा शहराध्यक्ष श्री.विरभद्रजी स्वामी तसेच निलंगा नगरीतील नगरसेवक, भाजपा परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.