निःशब्द! या दुःखाचे कोणत्या शब्दात सांत्वन करावे?

निःशब्द!
या दुःखाचे कोणत्या शब्दात सांत्वन करावे?
अतिवृष्टीने जमीन खरडून गेली, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथे नैराश्यातून २ शेतकरी बांधवांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे..
अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मांजरा धरणातून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडल्यामुळे नदीकाठची शेती पूर्णपणे वाहून व खरडून गेली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन तोकडी मदत देऊन त्यांची थट्टा करत आहे. म्हणूनच येत्या काही दिवसांत नदीकाठच्या व सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून ‘मांजरा तेरणा शेतकरी बचाव यात्रा’ काढण्यात येणार आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५०,००० रू. तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाखांची मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. मांजरा नदीला आलेला पूर हा अतिवृष्टीमुळे नाही तर चुकीच्या पद्धतीने पाणी सोडल्यामुळे आला आहे. शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे.