प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा बहुमान प्राप्त झाला..

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा बहुमान प्राप्त झाला..
भारताचे संविधान आजच्या दिवशी अंमलात आले. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी प्रजेच्या हाती सत्ता दिली गेली आणि म्हणून संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले.
निलंगा नगर परिषद, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित होतो. भारताची संस्कृती, एकता, अखंडता यांचे प्रतीक असलेल्या आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना प्राचीन काळापासून भारतीयत्व निर्माण करणाऱ्या आणि जपणाऱ्या महापुरुषांचे स्मरण होतेच. राष्ट्रहिताचे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे, विश्वबंधुत्वाचे स्मरण करून देणारा हा दिवस, आचंद्रसूर्य साजरा करता येवो, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!