प्रतिक्रिया

Testimonials

“लातूरचे पालकमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भिन्न भिन्न क्षेत्रांत मोलाचं योगदान आहे. अमाप परिश्रम करून एक सतर्क आणि दूरदृष्टीचा राजकीय नेता म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान बळकट केलेलं आहे. जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान, मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना ही बोलकी कामं समाजाने अनुभवलेली आहेत. परंतु जगाला जास्त माहीत नसलेल्या, लातूर जिल्ह्यातील त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मी अधिक सांगू शकतो.”

   पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे     (काका)  विवेकानंद रुग्णालय, लातूर.

Testimonials

“संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे पालकमंत्री म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचं काम त्यांनी केलंय. पालकमंत्री या नात्याने लातूरच्या औद्योगिक विकासामध्ये भर पडावी यासाठी लातूरमध्ये रेल्वे कोच निर्माण करण्याचा कारखाना आणला. यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासाला जी खीळ बसली होती, ती भरून निघणार आहे.”

  डॉ. गोपाळराव पाटील    ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टी, लातूर
Testimonials

“पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, तसंच जो प्रयत्न करतो त्याला यशाची वाट सापडते. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व ऊर्जा असावी लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संभाजीराव पाटील-निलंगेकर! त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तसेच अनुकूल परिस्थितीचा अत्यंत चांगला उपयोग करून घेत, गेल्या पाच वर्षांत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. त्यांनी लातूरला रेल्वे बोगीचा कारखाना आणून बेरोजगारी निवारणाचे प्रयत्न केले.”

सौ. स्मिता परचुरे  महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लातूर.
Testimonials

“सन २०१४ पर्यंत लातूर जिल्ह्यात कॉँग्रेसचा प्रभाव होता. मात्र आज लातूर जिल्हा शत-प्रतिशत भाजपमय बनला आहे. यात पालकमंत्री श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. आज आपण पाहिले, तर लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद एवढेच नव्हे, तर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकतोय. असा शत-प्रतिशत भाजपची सत्ता असलेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”

श्री. गणेश हाके प्रदेश प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र राज्य
Testimonials

“मा. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याच्या पालकाची भूमिका निभावली आहे. जिल्ह्यासह संपूर्ण लातूर शहराच्या समस्या समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मागील पाच वर्षांत काम केले आहे. शहरामध्ये लोकांची मागणी असतानादेखील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. संभाजीभैय्यांनी खूप मेहनत घेऊन आम्हांला मार्गदर्शन केले. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करून घेतली.”

 श्री. सुरेश पवार  माजी. महापौर, लातूर महानगरपालिका
Img_icon

“पालकमंत्री नामदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात काम करत असताना विकासाच्या अनेक योजना या भागामध्ये राबवल्या. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधीदेखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मा. पालकमंत्र्यांनी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आपल्या भागातील गोरगरीब कुटुंबांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या सोडवून खऱ्या अर्थाने आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.”

श्री.संजय दोरवे  माजी. समाज कल्याण सभापती, लातूर जिल्हा.
Testimonials

” दिलदार, विश्वासू, मनमिळावू, मित्रत्व पाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संभाजीभैय्या निलंगेकर पाटीलसाहेब. पालकाने आपल्या मुलाप्रमाणे जिल्ह्यातील जनतेला साथ द्यायची असते व त्यांच्या भविष्याची काळजीपण करायची असते. पालकमंत्री साहेबांनी लातूरमधील माता-भगिनींना गोलाई व इतर कोणत्याही ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे कुचंबणेला सामोरे जावे लागे, परंतु ही बाब लक्षात घेऊन लातूरमध्ये महत्त्वाच्या आणि योग्य ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली आहेत. आज सर्व लातूर त्यांना आशीर्वाद देत आहे.

श्री. अतुल ठोंबरे   आर्किटेक्ट, इंजिनिअर, व्हॅल्युअर संस्थापक अध्यक्ष, श्री जानाई प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष – रा.स्व.संघ जनकल्याण समिती लातूर.
Testimonials

“पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास अभियान खूप चांगल्या स्तरावर राबवण्यात आले आहे. लातूर विज्ञान केंद्रासाठी जी जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन! तसेच निलंग्यामध्ये दिव्यांगांसाठी जे आयटीआय विद्यालय सुरू केले जात आहे, तोदेखील अत्यंत चांगला उपक्रम आहे. लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे गिरवता यावेत, याकरिता सुरू करण्यात आलेले हे काही स्तुत्य उपक्रम आहेत.”

श्री. सुधाकर जोशी  जोशी मॅथ्स क्लासेस, लातूर
Img_icon

“मनमिळावू, मितभाषी, कर्तव्यदक्ष आमदार व लातूरचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्वांच्याच मनात त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. संभाजीभैय्या यांच्या दूरदृष्टीमुळे माझ्यासह सर्वांनाच खात्री झाली आहे, की लातूरचे भवितव्य हे उज्ज्वल आणि दैदीप्यमान असणार आहे. लातूर जिल्ह्याला अग्रेसर करण्यासाठी जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान, आरोग्य शिबिर आणि अशा इतरही योजनांच्या माध्यमातून शहरी भागासह ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.”

डॉ. गिरीश मैंदरकर     लातूर
Img_icon

” संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरला पाणीदार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत पाण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये एकाच हेतूने काम करत असताना पालकमंत्री म्हणून त्यांची भरपूर मदत झाली. यांनी सुरुवातीपासून लातूर जिल्ह्यातील समस्यांसाठी शाश्वत पर्यायाची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांची पोहोच पावती म्हणून याही वेळी जनता त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहील याची संपूर्ण खात्री आहे.”

श्री. मकरंद जाधव   आर्टऑफ लिव्हिंग, लातूर