राजवीरसह नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात तिरुपती येथे भगवान बालाजीच्या दर्शनाने झाली

राजवीरसह नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात तिरुपती येथे भगवान बालाजीच्या दर्शनाने झाली.. मुलांसह व परिवारासह प्रसंगानेच अगदी थोडा मिळणारा वेळ सात्विक सकारात्मक वातावरणात घालवावा असा कायम प्रयत्न असतो.

नव्या वर्षाची सुरुवात नव्या संकल्पाने व्हावी आणि संकल्प सिद्धीस जावा यासाठी आपल्या श्रद्धास्थानी प्रार्थना करून कर्म सुरू करावे, हा आपल्या भारतीय परंपरेने घालून दिलेला संस्कारांचा धडा पुढील पिढीला आपल्याच प्रामाणिक आचरणातून मिळत असतो. हे प्रामाणिक आचरण प्रवाहित होण्यासाठी असे सकारात्मक वातावरण देखील सहकारी होते.
मुलांना वेळ किती देता येतो, याहीपेक्षा जो वेळ मिळतो त्यात आपण त्यांना काय देऊ शकतो, हे अधिक महत्त्वाचे!