रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन शिबीरात मोठ्या प्रमाणावर शामिल होऊन रक्तदान केल्याबद्दल नागरिकांचे मन:पूर्वक आभार..!

स्वराज फाऊंडेशन; भाजपा युवा मोर्चा, वासनगाव; भाजपा युवा मोर्चा, लातूरचे युवा वॉरियर्स अशा अनेकांनी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन… या शिबीरात मोठ्या प्रमाणावर शामिल होऊन रक्तदान केल्याबद्दल नागरिकांचे मन:पूर्वक आभार..!
सध्या राज्यात कोरोना महामारी कहर दाखवत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गासोबत राज्यात ‘तुटवडा’ या नावाचा संसर्ग सुद्धा पसरतांना दिसत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरनंतर आता राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांचा जीव वाचण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आपण रोज पाहत आहोत.
मागील काही दिवसांपासून रक्ताचा पुन्हा तुटवडा राज्यात जाणवत असल्याचे लक्षात येताच, रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, लातूर येथे अनेकांनी रक्तदान शिबीर आयोजित करून संकटात सापडलेल्या बाधित रुग्णांना मदतीचा हात दिला.
राज्य संकटात असताना नेहमीच भारतीय जनता पक्ष आणि त्याचा कार्यकर्ता मदतीसाठी सरसावला आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आपण सामाजिक भान जपत अशाच प्रकारे समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या उपक्रमात वासनगाव शाखा अध्यक्ष श्री.विश्वजीत पाटील, श्री.अनिल पुजारी, श्री.रोहन लोभे, श्री.विशाल कदम, श्री.चैतन्य पाटील, श्री.रणजीत पाटील, श्री.चैतन्य हले, श्री.भुजंगराव पाटील, श्री.आकाश जाधव, श्री.रामहरी साळुंखे, श्री.समीर शेख तसेच लातूर येथील श्री.गणेश गोजमगुंडे, श्री.गजेंद्र बोकन, श्री.सागर घोडके, श्री.चंद्रशेखर पाटील, श्रीमती काजल पाटील, श्री.महादेव पिटले, श्री.चैतन्य फिस्के, श्री.आकाश जाधव, श्री.अमर पाटील, आयोजक श्री.संकेत गवळी यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांचे मनःपूर्वक आभार…
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव श्रीमती प्रेरणा होनराव व लातूर येथे श्री.अजित पाटील कव्हेकर यांनी पुढाकार घेऊन लोकहिताचा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा !