Loading...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक स्व.शिवरुद्रप्पाजी दानप्पा केवळराम यांचे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.उमाकांतजी होनराव यांचे सासरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुलक्षणाताई केवळराम यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक स्व.शिवरुद्रप्पाजी दानप्पा केवळराम यांचे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
१९६५ साली झालेल्या पाकिस्तानविरुध्दच्या युद्धात भारताला आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उभारण्यात आलेल्या मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता तर राम मंदिर आंदोलनात सुद्धा त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या हयातीत लातूरच्या गंजगोलाईचे बांधकाम, शिऊर, नळेगाव व ढोकीच्या तलावाचे व हरंगुळच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करून उत्तम अभियांत्रिकीचा नमुना सादर केला. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…
याप्रसंगी माजी स्थायी सभापती श्री.शैलेशजी गोजमगुंडे, श्री.शेषरावजी मम्माळे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई होनराव, श्री.उमाकांतजी होनराव, शोभाताई होनराव, श्री.ओमकारजी होनराव, ऐश्वर्याताई होनराव, शालिनीताई केवळराम, श्री.महादेवजी केवळराम, श्री.शरयूजी हुरदुळे, श्री.अनिलजी काळे, विजयाताई पानगावे आदींची उपस्थिती होती.