आमचे स्नेही श्री. रमेशजी सातपुते यांच्या निलंगा येथील औद्योगिक वसाहतीतील सायली वेस्ट कॉटन कारखान्याला भेट देऊन कारखान्यात आणलेल्या नव्या यंत्रांचे पूजन केले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया तसेच फमगादीची निर्मिती आदी गोष्टी जाणून घेतल्या.
रमेशजी यांचे योग्य व्यवस्थापन, प्रामाणिक कार्यपद्धत आणि दर्जेदार उत्पादन या गोष्टी नवउद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांचा हा व्यवसाय उत्तरोत्तर असाच वाढत राहील, असा ठाम विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना अनंत शुभेच्छा!
यावेळी खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी सांळूके, जिल्हा उपाध्यक्ष शेषेरावजी मंमाळे, निलंगा पत्रकार संघाचे अध्यक्ष रामजी काळगे, किशोरजी जाधव, माधवजी पिटले आदी मान्यवर उपस्थित होते.
