अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक, परिणामकारक आणि सक्षम करण्याच्या दिशेने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदयाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०१९ ते १५ ऑगस्ट २०१९ यादरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान’ राबविण्यात आले होते. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाचा कार्यभार नुकताच मा. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. असे असले तरीही अत्यंत कमी कालावधीमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना महत्त्व देऊन, त्यांनी या योजनेअंतर्गत गरजू लोकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. एकूणच बदलत्या काळानुसार अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये पारदर्शकतेसह आधुनिकीकरण आणण्यासाठी मा. मुख्यमंत्री आणि मा. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.