इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान

मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले, याची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निलंगा तालुक्यासह जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याची ‘दुष्काळमुक्त आणि जलयुक्त लातूर’ अशी ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने ‘इंद्रप्रस्थ जलभूमी अभियायाना’ची सुरुवात करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ म्हणजे ‘धनधान्य आणि पाण्याने समृद्ध असलेला प्रदेश’ अशी संकल्पना या अभियानामार्फत मांडण्यात आली आहे.
मा. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वात, या अभियानामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांना जलसंवर्धनाची माहिती देऊन, घरगुती पातळीवर जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण कशा प्रकारे करता येऊ शकते, या बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.