कौशल्य विकास व उद्योजकता

देशातील कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वात महत्त्वाचे कार्य करत आहे. यामध्ये नोकरी मागणारे हात न तयार करता, रोजगारी निर्मिती तयार करणारे लाखो हात तयार व्हावेत याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. ग्रामीण भागातील तरुणांना आणि महिलांना सक्षम बनवत नवकल्पनांच्या जोरावर त्यांना स्वावलंबी उद्योजक बनवणे, शेतकरी बंधूंना नवतंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रशिक्षित करणे तसेच विद्यार्थीदशेत असलेला महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षणासोबत कौशल्यात देखील पारंगत असावा. त्याने तंत्रज्ञानात उत्तम कामगिरी करावी आणि जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. राज्य सरकारकडून रोजगार निर्मितीवर अधिकचा भर देण्यात येणार असून, याअंतर्गत दरवर्षी ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यानुसार २०२२ पर्यंत ४.५ कोटी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे लक्ष आहे.