मराठवाडा वाॅॅटर ग्रीड

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर लातूर जिल्हा तसा अग्रेसर राहिलेला आहे. अनेक नेते या जिल्ह्याने दिले. त्यात सर्वांत तरुण नेते म्हणून संभाजी पाटील-निलंगेकर हे राज्याला परिचित आहेत. राज्यात एकीकडे ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना दुसरीकडे मराठवाड्यात मात्र राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हाती घेतला आहे. तर दुसरीकडे लातूरमध्ये मा. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रेरणेतून ‘इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लातूरला आणि उस्मानाबादला पाणीदार बनवण्यासाठी सर्व लातूरकरांनी आणि उस्मानाबादकरांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प हाती घेतला आहे.