शहर व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास

मा. श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. एकीकडे लातूर जिल्हा भाजपमय करीत असताना सामान्यांच्या दारात विकास कसा येईल याचा प्रयत्न ते करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील मागील पाच वर्षांत लातूर शहर व जिल्ह्यात आठ ते नऊ भेट दौरे करून श्री. निलंगेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. श्री. निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा विकासाची यशस्वी वाटचाल करीत आहे. लोकसभेच्या निवडणुकीने तर त्यांच्या नेतृत्वावर लातूरकरांनी शिक्कामोर्तबच केले. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य असलेले श्री. सुधाकर शृंगारे हा नवीन चेहरा त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरवला. सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आणून त्यांनी राजकीय इतिहासच घडवला.